महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्रमांक सेवाप्र-२०२३/प्र.क्र. ०६/कोषा (प्रशा-३), दिनांक ०९/०९/२०२४ नुसार संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवाप्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. सदर सेवाप्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे आहेत. त्यानुषंगाने अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती, पुणे विभाग तथा सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे यांचेकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे या विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे व कोषागार कार्यालय, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखापाल गट-क संवर्गातील सरळसेवेने भरतीसाठी फक्त ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. टपालाव्दारे/हस्तबटवड्याने अथवा कुरिअरने पाठविलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. २. सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |