उमेदवार हा भारतीय नागरीक व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. २) जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेली प्रवर्गनिहाय पदसंख्या कमी, जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे, आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्येत / आरक्षणात बदल झाल्यास त्याबाबतचा वेगळा खुलासा जाहिरातीद्वारे वा अन्य मार्गाने करण्यात येणार नाही. ३) जाहिरातीतील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक ती अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांनीच अर्ज करावा. संबंधित पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा ही उमेदवारांची कोणतीही कागदपत्रे व शैक्षणिक अर्हता यांची पूर्वतपासणी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना, अर्जात भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने, कागदपत्रांच्या पूर्ण पडताळणीनंतर तसेच शैक्षणिक पात्रता पुर्ततेच्या अधीन राहून उमेदवाराची गुणवत्तेच्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण निहाय निवड केली जाईल. ४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सामान्य (महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवार) अथवा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी (महानिर्मिती कंपनीचे किमान ०५ वर्षे किंवा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले / महानिर्मिती कंपनीचे ०१ ते ०४ वर्षे कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त महानिर्मिती कंपनी बी.टी.आर.आय. अंतर्गत आय.टी.आय. अभ्यासक्रम पूर्ण केलेले) या आरक्षणातून त्यांना लागू असलेला पर्यायच निवडावा व त्याबाबत खातरजमा करावी. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा / अंतिम निवड यादी प्रसिध्द करताना / केल्यानंतर उमेदवाराकडून वरील पर्याय निवडताना त्रुटी आढळून आल्यास, सदरील उमेदवाराच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |