Maharashtra Sports Department Bharti : महाराष्ट्र क्रीडा विभागात 12 वी पासवर मोठी भरती; पगार 35000 रुपये

Maharashtra Sports Department Bharti : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज 14 ऑगस्ट 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खालील पत्त्यावर पोहोचतील अशा देताना पाठवायचे आहेत.

पदांचा तपशील

क्रीडा प्रशिक्षक : एकूण पाच जागा

  • ज्युडो – 01 जागा
  • वेटलिफ्टिंग – 01 जागा
  • हॉकी – 01 जागा
  • जलतरण – 01 जागा
  • फुटबॉल – 01 जागा

शैक्षणिक पात्रता  

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी बारावी पास असावा क्रिडाविषयक अर्हता- उमेदवाराने एनआयएस पदविका किंवा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू ऑलिंपिक गेम्स, सेशन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स ,जागतिक अजिंक्य, जागतिक चषक युथ ऑलिंपिक, अॅप्रोएशियन गेम्स, युथ कॉम गेम्स, युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा व इतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभाग नोंदवलेला असावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्ती किंवा राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्ती व्यक्ति किंवा वरिष्ठ राजकीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व वरिष्ठ राज्यात तीन वेळा सहभाग घेऊन किमान एका स्पर्धेत पदक प्राप्त केलेला खेळाडू या भरतीसाठी पात्र असेल.

पगार  

निवड झालेल्या उमेदवारांना 35000 प्रतिमाहा एवढे मानधन देण्यात येईल व कामाची वेळ एकूण सहा तास असेल सकाळी 3 तास व दुपारी 3 तास.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे तो व्यवस्थित रित्या डाऊनलोड करून प्रिंट करून नीट भरून खालील पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने आवश्यक कागदपत्रसह, क्रीडा विषयक कागदपत्रासह , अनुभव प्रमाणपत्र सह कागदपत्राच्या छायांकित प्रती स्व-साक्षांकित करून 14 ऑगस्ट 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाठवायचे आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

आयुक्त क्रीडा व युवक सेवा शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी पुणे 411045 या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया 

प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल व त्यानंतर उमेदवाराचे अंतिम निवड करण्यात येईल.

उमेदवारासाठी सूचना

  • ही नियुक्ती मानधन तत्वावर असून कार्यक्षेत्र क्रीडा प्रबोधिनी पुणे हे राहील.
  • पदासाठी संबंधित उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारास ताई नियुक्तीचे कोणतेहि फायदे अनुज्ञेय राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • कोणत्याही कारणास्तव उशिरा आलेल्या प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज हा विहित नमुन्यातच असावा इतर पद्धतीने आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार (Maharashtra Krida Vibhag Bharti) नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

नवीन अपडेटेड जॉब्स पहा !!

Jilhadhikari Karyalay Parbhani Bharti : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिपाई व संगणक ऑपरेटर पदांसाठी भरती;येथे करा अर्ज