म्हाडा मुंबई अंतर्गत स्थापत्य अभियंता व इतर पदांसाठी भरती;पगार 70,000 रुपये दरमहा

प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत (PMAY) मंजुर घरांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याकरीता कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा घटक) विभागामार्फत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील (CLTC) तज्ञांची एकत्रित वेतनावर तात्पुरत्या स्वरुपात केवळ ११ महिन्यांच्या नियुक्तीकरीता दि. १४/०२/२०२५ ते दि. २१/०२/२०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत रुम नं. १६८, पोट मजला, गृहनिर्माण विभाग, वांद्रे (पू), मुंबई ४०००५१ येथे अर्ज मागविण्यात येत आहेत. (सुट्टीचे दिवस वगळून १५/०२/२०२५, १६/०२/२०२५ व १९/०२/२०२५)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तरी सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी https://www.mhada.gov.in या संकेतस्थळावर Quick Links या टॅबमध्ये सादर केलेल्या माहितीपुस्तिकेनुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव व इतर कागदपत्रांसह रुम नं. १६८, पोट मजला, गृहनिर्माण विभाग, वांद्रे (पू), मुंबई- ४०००५१ या कार्यालयात अर्ज सादर करावा व सदर अर्जाच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांनाच ई-मेलद्वारे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा