एमआयडीसी मध्ये विविध पदांसाठी 749 रिक्त जागांवर पदवीधरांना नोकरीची संधी

म.औ.वि.महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत गट अ, गट-ब आणि गट-क या संवर्गातील एकूण ३४ संवर्गातील ८०२ पदे भरणेबाबत दि. १४/०८/२०२३ रोजी दैनिक वर्तमान पत्रामध्ये व महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार दि.०२/०९/२०२३ ते दि.२५/०९/२०२३ या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले आहेत. जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या एकूण ३४ संवर्गापैकी ११ संवर्गासाठीची स्पर्धा परीक्षा दि.३०/०३/२०२४, दि. ०२/०४/२०२४ व दि. ०३/०४/२०२४ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४, दि. २६ फेब्रुवारी, २०२४ नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णय क्रमांक बीसीसी२०२४/प्र.क्र.७५/१६-क दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ नुसार महामंडळातील ३४ संवर्गाच्या एकूण ८०२ पदांसाठींच्या जाहिरातीकरीता लागू आहेत. तसेच, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक मआसू २०२३/प्र.क्र.०३/१६-क, दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ अन्वये महामंडळाच्या सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत ज्या उमेदवारांनी अराखीव (खुला) (Open) व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गामधुन अर्ज सादर केलेले आहेत, परंतु ते इतर मागास वर्गातील (कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी) या प्रवर्गामध्ये मोडतात अशा उमेदवारांना इतर मागासवर्गामधुन अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात-2023येथे क्लिक करा
PDF जाहिरात-2025येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज
येथे क्लिक करा