MSF भरती 2024: तब्बल 10000 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज फक्त या उमेदवारांसाठी | MSF BHARTI 2024

MSF Bharti 2024 : सुरक्षा रक्षक (कंत्राटी) निकष पडताळणी-२०२४ उमेदवारांसाठी सुचना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून कार्यालयीन आदेश प्राप्त झाले असून यादीतील उमेदवाराने पडताळणी साठी उपस्थित राहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

उमेदवारांची दिनांक निहाय यादी महामंडळानी दिलेल्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी दिनांक निहाय यादी प्रमाणे सकाळी १०.०० वा. महामंडळाचे निकष पडताळणीसाठी गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोळ, मुंबई येथे हजर रहावे. (दुपारी ०३.०० वा. नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.)

निकष पडताळणीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर रहावे लागेल. निकष पडताळणी केंद्रावरती उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही.

उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना निकष पडताळणी केंद्रावर आणू नये. फक्त उमेदवारांनाच निकष पडताळणीसाठी प्रवेश दिला जाईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारास दिलेल्या दिनांकास अपवादात्मक परिस्थितीत (इतर तातडीचे काम) निकष पडताळणीस हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिध्द केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात. परंतु दिनांक २०/१२/२०२४ रोजी शेवटचा दिवस असून त्या दिवशीही गैरहजर राहील्यास त्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. व निकष पडताळणी २०२४ करीता विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी निवासाची व्यवस्था स्वतः करावी. निकष पडताळणीसाठी दिलेल्या दिनांक व वेळेस हजर रहावे. त्यापुर्वी कोणीही भरतीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये. सदर ठिकाणी वेळेच्या आधी आल्यास तेथे प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ज्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश प्राप्त झालेला आहे. किंवा वेबसाईटवर प्रसिध्द यादीत ज्यांचे नावे आहे, त्यांनीच सदर ठिकाणी हजर राहवे व इतरांना प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी १०/१२ वी पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र, जन्म दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडण्याचा दाखला / आधार कार्ड पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र / वाहन चालवण्याचा परवाना (असल्यास) / मुळ प्रती सोबत आणावेत. तसेच सोबत पोलीस भरती मध्ये मैदानी व लेखी परिक्षेस हजर राहील्याबाबतची (प्रवेश पत्र) कागदपत्राच्या मुळ व छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
  • जे उमेदवार यापुर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहेत / किंवा कार्यरत होते. व त्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली आहे. किंवा करार खंडीत करण्यात आला आहे. किंवा या पुर्वी प्रशिक्षणास पाठवण्यात आले होते. परंतु राजीनामा, गैरहजर किंवा भगोडा या कारणामुळे प्रशिक्षण सोडून गेलेले किंवा प्रशिक्षण पूर्ण केलेले असून महामंडळाच्या नेमणूक प्रतिक्षाधीन यादीवर आहेत.
  • असे उमेदवार सन- २०२१ च्या पोलीस भरतीस हजर राहलेले आहेत. त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळाला किंवा वेबसाईटवर प्रसिध्द यादीत त्यांचे नावे असले तरी, त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहु नये. हजर राहील्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. तसेच दिशा भुल करुन महामंडळात पुन्हा नेमणूक मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
कार्यालयीन आदेशयेथे क्लिक करा
उमेदवारांची यादीयेथे क्लिक करा

 


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading