MSRTC Bharti 2025 : एसटी महामंडळामध्ये नोकरीची संधी मिळविण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये विविध पदांच्या 367 रिक्त जागांसाठी हि भरती आयोजित करण्यात आली आहे.
या भरती करीत ऑनलाईन अर्ज सादर करायचे असून त्याची लिंक व इतर माहिती खाली नमूद केलेली आहे. नागपूर व भंडारा जिल्ह्यामध्ये हि भरती राहणार आहे त्याकरिता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून अर्ज सादर करू शकणार आहेत.
पदांचा तपशील :
अभियांत्रिकी पदवीधर, मॅकेनिकस मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स,वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफिजरेशन अँड एअर कंडिशनिंग),इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, कारपेंटर
एकूण रिक्त जागा : 367
शैक्षणिक अर्हता व इतर निकष
या पदभरतीसाठी विविध पदानुसार शिक्षण दरविण्यात आले असून सर्व उमेदवाराने 10 वी व संबंधित विषयात आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे, इतर अर्हतेसाठी खाली दिलेल्या मूळ जाहिराती वाचाव्यात.
उमेदवारांचे वय 11 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीयांसाठी वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली असून त्यांचे वय जास्तीत जास्त 43 वर्ष असावे.
अर्जाचे शुल्क
उमेदवाराने अर्ज केलेल्या आस्थापने नुसार त्या जिल्ह्याची जाहिरात वाचून त्यामध्ये दिलेल्या नावाने धनाकर्ष काढावा हा धनाकर्ष मागास वर्गांसाठी आणि इतर वर्गांसाठी 590 रुपये असेल तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी 296 रुपये असावा.
अर्ज पद्धती
उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दिनांक 23 जुलै 2025 पासून 11 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करायचे आहेत, खाली लिंक दिलेली त्या लिंकवरून तुम्ही अर्ज सादर करू शकता.
अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रिंट, धनाकर्ष व खाली नमूद केलेली कागदपत्रे घेऊन जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर जमा करावेत.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
आयटीआय चे प्रमाणपत्र व सर्व सत्रांचे गुणपत्रक
जन्मतारखेची शाळा सोडल्याचा दाखला
जातीचे प्रमाणपत्र
इतर आवश्यक कागदपत्रे.
पगार
या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला शासन निर्णयाप्रमाणे विद्यवेतं देण्यात येणार असून हे वेतन शासन आणि परिवहन महामंडळ या दोघांमार्फत दिले जाईल.
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी आणि अर्ज सादर करावा व त्या सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात. जाहिरातीमध्ये दाखविल्या व्यतिरिक्त कोणतेही वेगळे शुल्क विद्यार्थ्याने कोणालाही देऊ नये हि भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणत्याही एजंट द्वारे हि पदे भरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी व कोणत्याही भूलथापांना बाली पडू नये.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |