Nagari Sahakari Bank Bharti : देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या बँकेत लिपिक संवर्गासाठी पदभरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया तसेच पदाकरिता आवश्यक शैक्षणिक व इतर अर्हता जाहिरातीमध्ये पाहून त्यानंतर अर्ज सादर करावा.
◼️पदांचा तपशील : लिपिक 60 जागा
◼️शैक्षणिक अर्हता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणकाचे तसेच मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
◼️वयोमर्यादा : दिनांक 18 सप्टेंबर 2024 ला वय कमाल 35 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◼️वेतन : प्रशिक्षण कालावधीत एकत्रित वेतन 15000 रुपये प्रतिमाह देण्यात येईल व त्यानंतर काम समाधानकारक वाटल्यास बँकेच्या कायमसेवेत सामावून घेतले जाईल तसेच बँकेच्या नियमाप्रमाणे वेतन श्रेणी लागू जाईल.
◼️अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्जदाराने 18 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 12:00 वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक असेल.
अर्ज सादर करण्याविषयीची संपूर्ण प्रक्रिया जाहिरात मध्ये दिलेली असून जाहिरात खालील लिंक करून डाऊनलोड करून त्यानंतर अर्ज सादर करू शकता.
◼️परीक्षा शुल्क : सर्व उमेदवारासाठी 700 रुपये व जीएसटी एवढे परीक्षा शुल्क लागू असेल.
◼️उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना
- लिपिक पदाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल व ही परीक्षा छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्यानंतर अर्ज सादर केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी.
- उमेदवाराने अर्ज भरताना संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता धारण करत असल्याची खात्री करूनच अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया दरम्यान संकेतस्थळवर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करून भरती प्रक्रियेचे अद्यावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराचे राहील.
- इच्छुक उमेदवाराने अर्जातील माहिती पूर्ण भरून वैध मेल आयडी व विहित मुदतीत नोंदणी करावी.
- उमेदवारांनी परीक्षा कागदपत्र पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- आवश्यक असलेल्या पदासाठी पात्र उमेदवारांची व्यक्तिगत मुलाखत घेण्यात येईल.
- कोणत्याही परिस्थिती भरण्यात आलेले परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक तसेच पात्र असाल तर खालील लिंक करून जाहिरात डाऊनलोड करा व ऑनलाईन अर्ज लगेच सादर करा.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
◼️या महिन्यातील इतर महत्वाचे जॉब्स
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी मेगा भरती; लगेचच अर्ज करा | Union Bank Recruitment