ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे भरती; जाणून घ्या आवश्यक पात्रता? | Ordnance Factory Recruitment 2024

Created By Aditya, Date : 05.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Ordnance Factory Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, आयुध निर्माणी कारखान्यामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.आयुध निर्माणी कारखाना अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Ordnance Factory has released a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode.

◾भरतीचा विभाग : हि केंद्र शासनाच्या दारुगोळा निर्मिती कारखान्या मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

◾पदांचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने पाठवायचे आहेत

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️प्रोजेक्ट इंजिनिअर – 20 जागा

1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अथवा पदविका.

2]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत (वयाच्या शिथिलतेसाठी जाहिरात वाचावी)

3]निवड झालेल्या उमेदवाराला 39338 एवढे मानधन दिले जाणार आहे.

◾नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी, महाराष्ट्र

◾निवड प्रक्रिया : पदवी किंवा पदविकेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार निवड करण्यात येईल.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 22 डिसेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, A Unit of Munitions India Limited, Dist : Chandrapur (M.S), Pin – 442501

◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही

◾अधिकृत संकेतस्थळ : https://ddpdoo.gov.in/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.