Panvel Mahanagarpalika Bharti 2024 : पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.
ही मुलाखत 04 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 02 ते संध्याकाळी 05 या वेळेमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत, इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने सदर पदांसाठी अर्जाचा विहित नमुना खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे, विहित नमुना डाऊनलोड करून मुलाखतीला 4 सप्टेंबर रोजी हजर राहावे.
👉पदांचा तपशील
1. पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : 05 जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस व एम एम सी ची नोंदणी आवश्यक आहे, अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा : जास्तीत जास्त 70 वर्ष
मानधन : 60 हजार रुपये प्रतिमाह
2.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 11 जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस व एम एम सी ची नोंदणी आवश्यक आहे, अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा : जास्तीत जास्त 70 वर्ष
मानधन : 30 हजार रुपये प्रतिमाह
3.वैद्यकीय अधिकारी : 03 जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस व एम एम सी ची नोंदणी आवश्यक आहे, अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा : जास्तीत जास्त 70 वर्ष
मानधन : 60 हजार रुपये प्रतिमाह
4.मानसोपचार तज्ञ : 02 जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, एमडी आणि एम एम सी ची नोंदणी आवश्यक.
5.नाक, कान व घसा तज्ञ : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : एम एस, इ एन टी,एम एम सी चे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक.
मानधन : प्रत्येक भेटीसाठी दोन हजार रुपये देण्यात येतील.
👉अर्ज करण्याची प्रक्रिया : ही निवड मुलाखती द्वारे होणार असून उमेदवारांनी जाहिरातीमधील अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा व थेट मुलाखतीला हजर राहावे.
👉वयोमर्यादा : अर्ज भरण्याच्या दिनांकास उमेदवारी जाहिरातीमध्ये विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक असेल, 25 मे 2019 रोजीच्या पत्रानुसार वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ञ, अतिविशेष तज्ञ याची वयोमर्यादा 70 वर्षे राहील.
वयाच्या 60 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त केलेल्या शारीरिक दृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडणे आवश्यक असेल.
👉अर्जाचे शुल्क : उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्क साठी राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्षक जोडणे आवश्यक आहे, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता 150 व राखीव प्रवर्गाकरिता 100 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागेल, हा धनाकर्ष इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी पनवेल या नावे काढलेला असावा व राष्ट्रीयकृत बँकेचा असावा.
👉निवड प्रक्रिया : सदर पद भरती करिता प्राप्त होणाऱ्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवाराची थेट मुलाखत पनवेल महानगरपालिका स्तरावर निवड समिती मार्फत घेण्यात येईल, जाहिरातीमध्ये दिल्यानुसार गुणांकन पद्धतीने उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे.
👉उमेदवारासाठी सूचना
- उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणे अचूकपणे नोंदवावे, अर्जासोबत माध्यमिक शालान्त परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
- माध्यमिक शालान्त परीक्षा प्रमाणपत्र मध्ये जामूद केलेली जन्मतारीख अर्जात नमूद करावी अर्ज उमेदवाराची लिंग व वैवाहिक दर्जा याबाबतची माहिती नमूद करणे आवश्यक असेल.
- जाहिरातीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरूपाच्या असून हे राज्य शासनाचे नियमित पद नाही या पदाचा राज्य शासनाच्या पदाशी काही संबंध नसून उमेदवार भविष्यात राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करू शकणार नाही.
- उमेदवाराने थेट मुलाखतीचे वेळेस अर्ज सोबत मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित प्रति सादर करणे बंधनकारक आहे.
मुलाखतीची वेळ : वर नमूद केलेल्या सर्व पदासाठी 4 सप्टेंबर 2024 वार बुधवार रोजी मुलाखत घेतल्या जाणार आहेत ही मुलाखत 02 ते 05 या वेळेमध्ये घेतली जाणार असून या मुलाखतीसाठी कागदपत्राची तपासणी सकाळी 11 ते 01 वाजे दरम्यान घेतल्या जाईल.
मुलाखतीचे ठिकाण : पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, देवळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल-410 201
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा
पाटबंधारे विभागात “या” पदांवर निघाली भरती; सरकारी नोकरीची चांगली संधी | Patbandhare Vibhag Bharti