पनवेल महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु;कोणतीही परीक्षा नाही | Panvel Mahanagarpalika Bharti 2024

Panvel Mahanagarpalika Bharti 2024 : महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून नमूद केलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीस हजर रहावे. महानगरपालिकेतील माहिती व जनसंपर्क कार्यामार्फत हि भरती राबविण्यात येणार आहे त्यासाठी थेट मुलाखत आयोजित करण्यात आल्या आहेत.

Panvel Municipal Corporation has published a new recruitment advertisement for various posts, interested and eligible candidates should read the detailed advertisement and attend the interview with all the documents on the given date at the mentioned address.

◾भरतीचा विभाग : हि भरती पनवेल महानगरपालिकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : जाहिरात वाचावी

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखत होणार असून त्याच ठिकाणी अर्ज मिळतील.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️माहिती व जनसंपर्क अधिकरी – 01 जागा

1]शासकीय / निमशासकीय/नगर परिषद / न.पा/ म.न.पा.मध्ये सेवेत असताना किमान ५ वर्षे माहिती व जनसंपर्क विभागामध्ये काम केल्याचा अनुभव.

2]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 69 वर्षांपर्यंत

3]निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मानधन दिले जाणार आहे.

◾नोकरीचे ठिकाण : पनवेल महानगरपालिका, रायगड

◾अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही.

◾मुलाखतीची तारीख : दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर रहावे.

◾मुलाखतीचा पत्ता : आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल, जिल्हा रायगड.

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.panvelcorporation.com/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.

◾करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितांस शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे / सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार / हक्क नसेल,नियुक्तीसाठी सक्षम असलेल्या प्राधिकरणाने विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा कर्मचाऱ्यांच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीस सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध (conflict of interest) जाहीर करणे आवश्यक राहील.

◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींस प्राप्त होणाऱ्या अधिकारा अंतर्गत येणारे आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे माहिती व आचार सामुग्री याबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.

◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर सोपविलेले कामकाज, निश्चित केलेल्या विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मुल्यमापन करतील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा.