सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयस क्र. संकीर्ण-2715/ प्र.क्र.100/13 दि. 17/12/2016 व दि.21/02/2018 त्याचप्रमाणे प्राधिकरण कार्यकारी समिती बैठक दि.29/08/2018 चा ठराव क्र. 4 नुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे अभियांत्रिकी विभाग क्र.2 या विभागात विवक्षित सेवा/कामांसाठी सेवानिवृत्त अधिकारी करार पध्दतीने नियुक्त करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.
इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज दि.05/02/2024 रोजी सकाळी 11 वाजलेपासून दिनांक 12/02/2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत वरील पत्त्यावर अथवा pune-metroline३@pmrda.gov.in या ई मेल वर आवश्यक कागदपत्रांसह पाठवावा. अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आय.डी. नमूद करावा. मुदतीत अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची दि. 15/02/2024 रोजी सकाळी 11 ते दु.2.00 वाजेपर्यतच्या कालावधीत आकुडों कार्यालय सातवा मजला येथे समितीव्दारे मुलाखत घेण्यात येईल. यासाठी कोणताही स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. योग्य उमेदवार न मिळाल्यास सदर प्रक्रिया रद्द करण्याचे अथवा फेरप्रक्रिया राबविण्याचे संपूर्ण अधिकार महानगर आयुक्त यांना राहतील.
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
💻अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |