Post Office Bharti Result 2024 : इंडिया पोस्टने अधिकृत वेबसाइट वर सर्व मंडळांसाठी GDS निकाल 2024 ची तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र व हरियाणा राज्यातील गुणवत्ता याद्या निवडणुकीमुळे प्रसिद्ध झाल्या नव्हत्या त्या याद्या आता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
ज्या उमेदवारांना त्यांचे नाव आणि रोल नंबर तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये असतील त्यांनी 20 डिसेंबर 2024 पूर्वी नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांद्वारे दस्तऐवज पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. GDS 3री मेरिट लिस्ट नुसार एकूण 1154 उमेदवार इंडिया पोस्ट GDS पदांसाठी निवडले गेले आहे.
यावर्षी, ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/ डाक सेवक पदांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. पोस्टाची 1ली व 2री यादी या अगोदरच जाहीर झाली आहे.
पोस्ट ऑफिस निकाल 3री यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे ज्या उमेदवारांची नावे पहिल्या गुणवत्ता यादीत नव्हती असे सर्व उमेदवार जाहीर झालेल्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतून त्यांच्या निकालाची स्थिती तपासू शकतात. सर्कल नुसार इंडिया पोस्ट GDS निकाल 2024 चे PDF खालील लिंकवरून पाहू शकता.
इंडिया पोस्ट GDS निकाल 2024 तिसरी गुणवत्ता यादी जाहीर : दस्तऐवज पडताळणी फेरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या रोल नंबरसह इंडिया पोस्ट ऑफिस GDS निकाल 2024 PDF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे ही तिसरी गुणवत्ता यादी आहे.
इंडिया पोस्ट GDS निकाल आणि गुणवत्ता यादी pdf अधिकृत वेबसाइट https://indiapostgdsonline.gov.in/ वर सर्कल नुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. तिसरी गुणवत्ता यादी आल्यामुळे, निवडलेल्या उमेदवारांना आता प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहार आणि त्यांच्या अर्जाच्या तपशिलांच्या सत्यतेबाबत एक हमीपत्र सादर करावे लागेल.
GDS निकाल 2024 (सर्कलनुसार) : ज्या उमेदवारांची नावे पोस्ट ऑफिस GDS निकाल 2024 PDF मध्ये दिलेला आहे, सर्कल नुसार प्रसिद्ध झालेल्या या यादीत उमेदवार आपले नाव चेक करू शकतात.
ज्यांची नावे आहेत त्यांना त्यांच्या संबंधित मंडळांमधील ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर अंतिम नियुक्ती मिळविण्यासाठी कागदपत्र पडताळणी फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल. निवडलेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांमार्फत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी.
इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट 2024 (तिसरी यादी) : 44228 GDS/ BPM/ ABPM रिक्त पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची India Post 3rd Merit List गुणवत्ता यादी सर्व मंडळांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट GDS 3री गुणवत्ता यादी 2024 PDF खालील लिंक्सवरून डाउनलोड करू शकता.