Created by Ashish, 13 February 2025
RTE Admission 2025 : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आलेल्या अर्जाची ऑनलाइन सोडत सोमवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. राज्यातील 8 हजार 863 शाळांमधील एकूण 01 लाख 09 हजार 111 जागांसाठी 03 लाख 05 हजार 159 बालकांचे अर्ज आले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन सोडत जाहीर झाली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 (आरटीई) नुसार खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सभागृहात नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत चिठ्ठया काढून ही सोडत काढण्यात आली.
निवड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर, ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात चिठ्ठया उचलल्यानंतर प्रत्यक्ष ऑनलाइन सोडत प्रक्रियेस सुरवात करण्यात येते.
विद्यार्थ्यांनी चिठ्ठया उचलून काढलेल्या नंबरच्या सहाय्याने काही गुणसूत्र वापरून राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रामार्फत (नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर-एनआयसी) सोडत काढली जाते. त्यासाठी तीन-चार दिवसांचा अवधी लागतो.
साधारणतः शुक्रवार (ता. 14) ते शनिवार (ता.15) पर्यंत एनआयसीमार्फत ऑनलाइन सोडतीचे तांत्रिक काम पूर्ण होईल. त्यानंतर येत्या शनिवारपासून (ता.15) निवड यादीत असलेल्या बालकांच्या पालकांना प्रवेशाबाबतचे संदेश अर्जात नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे गोसावी यांनी सांगितले.
तक्रार नोंदवा
‘आरटीईअंतर्गत २५% राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रियाही पूर्णपणे पारदर्शकच होत आहे. त्यामुळे, पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. आरटीई २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देतो, असे कोणी एजंट सांगत असल्यास, त्याची तक्रार त्वरित संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे करा. त्यांच्या कठोर कारवाई करण्यात येईल.
आरटीई प्रवेश प्रवेश नाकारणाऱ्या शाळांविरोधातही पालकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात. आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीत गेल्यानंतर शाळांकडून थेट ट्रान्स्फर सर्टिफिकेट’ (टीसी) दिले जात असल्यास, अशा पालकांनीही तक्रार नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा. शिक्षण विभागातर्फे निश्चितच पालकांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल.
निवड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.