Satara DCC Bank Bharti : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (SDCC Bank Bharti) विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
👉पदसंख्या : 323 रिक्त जागा
👉पदांचा तपशील : कनिष्ठ शिपाई – 60 जागा, कनिष्ठ लेखनिक (ज्युनिअर क्लार्क) – 263 जागा
👉शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच उमेदवाराला इंग्रजी भाषेचे व संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
👉वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी कमीत कमी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
👉अर्जाचे शुल्क /परीक्षा शुल्क : याभरती मध्ये अर्ज शुल्क म्हणून 590 रुपये आकारण्यात आलेले आहे.
👉पगार : या भरती प्रक्रियेमध्ये अर्जदाराला पदानुसार पगार देण्यात येणार आहे (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी).
👉निवड पद्धती : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखती द्वारे होणार आहे.
👉नोकरीचे ठिकाण : सातारा
👉अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
हे हि वाचा…
Maha Metro : महा मेट्रो मध्ये नवी मुंबई,पुणे व नागपूर येथे मोठी भरती; लगेचच अर्ज करा