Created by Ashish, 27 February 2025
Shipai Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत नागपूर खंडपीठाचे आस्थापनेवर शिपाई पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे एकूण 36 रिक्त पदासाठी ही पदभरती जाहीर केल्या असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज पीडीएफ जाहिरात व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरून तुम्ही जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज सादर करू शकता 18 फेब्रुवारी 2025 ला ही लिंक चालू झाली असून 04 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकणार आहात.
Under Bombay High Court, Nagpur Bench has published an advertisement for the recruitment of the post of Peon for a total of 36 vacancies, and for this, interested and eligible candidates have to submit their application through online mode. |
◾भरतीचा विभाग : हि मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर बेंचवर निघालेली आहे.
◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : शिपाई पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : 07वी,08वी,10वी पास उमेदवाराने अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : शारीरिक क्षमता व तोंडी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा , कोणत्याही भरतीसंदर्भात आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
◾शिपाई -45 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त संस्थेतून 07वी,08वी,10वी पास आवश्यक.
▪️उमेदवाराला मराठी भाषा बोलता,वाचता आणि लिहिता येणे आवश्यक.
▪️उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
◾एकूण पदसंख्या : 36 निवड यादी व 9 प्रतीक्षा यादी
◾नोकरीचे ठिकाण : नागपूर, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागासवर्गींसाठी 43 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन पद्धतीने 04 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करुनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज Submit केल्यानंतर त्या अर्जाची Printout काढावी. सदरील अर्ज उमेदवाराने स्वतः जवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करुन ठेवावा. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोष्टाने पाठवू नयेत, मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार सदरील अर्जाची प्रत आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 16600 – 52400 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/
◾ऑनलाईन नोंदणी शुल्क आणि त्याबाबत सूचना : उमेदवाराला अर्ज करतांना नोंदणी शुल्क ५०/- (रुपये पन्नास मात्र) ‘SBICollect’ व्दारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. सदर शुल्क हे नापरतावा आहे. त्यासाठी उमेदवारांनी ‘User Manual’ मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण जाहिरातीतील नमुद शैक्षणिक पात्रता व इतर बाबींची पूर्तता केली असेल तरच आपला अर्ज स्विकारला जाईल.
◾उमेदवाराने स्वतःच्या माहितीस्तव जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रत Print Application मध्ये जाऊन Registration ID No. टाकून Print काढून स्वतःकडे जतन करुन ठेवावी.
◾परीक्षेसाठी उमेदवाराना प्रवेश प्रमाणपत्र ई-मेल द्वारे पाठविण्यात येईल. उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे सक्तीचे आहे. प्रवेश प्रमाणपत्र सोबत नसल्यास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
◾अल्पसुचीत पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणी तसेच तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येईल. यासाठी उमेदवारांने संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.