दारुगोळा निर्मिती कारखाना खडकी पुणे येथे 50 जागांसाठी भरती | Ammunition Factory Khadki Bharti 2025

Ammunition Factory Khadki Bharti 2025 : दारुगोळा निर्मिती कारखाना खडकी पुणे येथे विविध पदे भरायचे आहेत यासाठी त्यांनी जाहिरात प्रकाशित केलेली आहे खडकी येथील दारूगोळा कारखान्यामध्ये जी पदे भरायचे आहेत त्या पदांमध्ये पदवीधर अभियंता व पदविकाधारक अभियंता यासाठी ही जाहिरात प्रकाशित केलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून खालील दिलेल्या लिंक वरून पीडीएफ आहेत डाऊनलोड करून त्यानंतर अर्ज सादर करावा अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसाच्या आत सादर करायचे आहेत अर्ज सादर करण्यासाठी अर्जाचा नमुना जाहिरातीमध्येच उपलब्ध आहे.

पदांबाबत माहिती

या पदभरती मध्ये पदवीधर व पदविकाधारक अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवार म्हणून भरती केल्या जाणार आहे यामध्ये सिविल इंजीनियरिंग दहा जागा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग दहा जागा, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इंजीनियरिंग दहा जागा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग दहा जागा, प्रोडक्शन इंजिनिअरिंग दहा जागा अश्या एकूण 50 जागांसाठी ही भरती राहणार आहे.

यासाठी उमेदवार हा किमान पदविका धारण केलेला असावा व पदवी धारण केलेली असल्यास ते मान्यता प्राप्त विद्यापीठातून झालेले असावे जे विद्यार्थी नजीकच्या काळात उत्तीर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉब ची संधी उपलब्ध राहणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज करण्याची पद्धत व इतर माहिती

अर्ज करण्यासाठी उमेदवाराला खालील लिंक वरून अर्जाचा नमुना व जाहिरात डाऊनलोड करायची आहे जाहिरातीमध्येच अर्जाचा नमुना दिला असून हा अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या भरून त्या अर्जासोबत आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र, दहावीचे प्रमाणपत्र, अभियांत्रिकी पदविका किंवा पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र व कोऱ्या कागदावर डिक्लेरेशन भरून द्यावे.

या पदभरती साठी तुम्ही 18 डिसेंबर 2024 पासून 21 दिवसाच्या आत अर्ज सादर करू शकणार आहेत, जाहिरातीतील अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या भरून द चीफ जनरल मॅनेजर, अम्युनिशन फॅक्टरी, खडकी, पुणे 411003 महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहेत. हे अर्ज तुम्ही पोस्टाने किंवा समक्ष जाऊन त्या ठिकाणी जमा करू शकता.

उमेदवारासाठी सूचना

उमेदवाराने ऑफलाइन फॉर्म सोबतच गुगल फॉर्म ची लिंक दिलेली आहे त्या गुगल फॉर्म च्या लिंक वर जाऊन सुद्धा सविस्तर माहिती भरायची आहेत गुगल फॉर्म मध्ये माहिती व्यवस्थित रित्या भरली नसल्यास असे अर्ज रिजेक्ट केल्या जातील याची उमेदवाराने नोंद घ्यावी, या सोबतच जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी आपली नोंदणी NATS च्या पोर्टलवर केलेली असावी जर ही नोंदणी उपलब्ध नसल्यास असा उमेदवाराचे सुद्धा अर्ज नाकारले जातील याची त्यांनी नोंद घ्यावी.

उमेदवाराने पदवी किंवा पदविका मागच्या वर्षी उत्तीर्ण केलेली असावी व या अगोदर कुठे काम केल्याचा अनुभव उमेदवाराला नसावा या ठिकाणी विद्या वेतन म्हणून पदवीधर विद्यार्थ्यास 9000 तर पदविका धारक उमेदवारास 8000 रुपये दरमहा एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर खालील दिलेल्या लिंक वर अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या भरा एनएटीएस पोर्टलवर नोंदणी करा आणि गुगल फॉर्म भरून वेळेवर अर्ज सादर करा वर दिलेल्या भरतीची माहिती अर्धवट असू शकते उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर ऑनलाईन ऑफलाइन ज्या पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्या पद्धतीने अर्ज भरून नमूद केलेल्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

गुगल फॉर्म भरा : https://forms.gle/nVBA5KNx331R7je76

एन ए टी एस पोर्टल : नोंदणी करा