Created by Ashish, 15 February 2025
Thane Mahanagarpalika Jobs 2025 : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे एकूण 33 जागांसाठी ही भरती घेण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि खाली नमूद केलेल्या तारखेस थेट मुलाखतीस हजर राहावे मुलाखतीला जाण्याअगोदर उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावे व त्यानंतरच सर्व कागदपत्रासह मुलाखतीला हजर राहावे ही मुलाखत 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून सुरू होणार आहे.
Public Health Department of Thane Municipal Corporation has published a recruitment advertisement for various posts under the Chief Minister’s Maternal Health Scheme for a total of 33 vacancies and interested and eligible candidates are required to attend the live interview on the below mentioned date. |
◾भरतीचा विभाग : हि ठाणे महानगरपालिके अंतर्गत मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत निघालेली आहे.
◾भरतीचा प्रकार : महानगरपालिकेत नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️विभाग प्रमुख-०१ जागा
शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातील वैद्यक शास्त्रातील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी.
▪️वैद्यकीय अधिकारी -04 जागा
शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातील वैद्यक शास्त्रातील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी.
▪️सिस्टर इन्चार्ज -04 जागा
शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातील GNM अथवा बीएस्सी पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
▪️स्टाफ नर्स – 24 जागा
शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातील GNM अथवा बीएस्सी पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
◾एकूण पदसंख्या : 33 जागा
◾नोकरीचे ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागासवर्गींसाठी 43 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◾मुलाखतीची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 18 फेब्रुवारी 2025 मुलाखतीला हजर राहावे..
◾मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 30000 – 185000 मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾शासन निर्णय क्रमांकः ठामपा-२१२२/प्र.क्र.४१/नवि-२३, दिनांक २७ जुन २०२३ रोजीच्या सेवाप्रवेश नियम २०२३ मध्ये विहित केलेल्या अर्हतेव्यतिरिक्त गट-ड वर्ग वगळता इतर पदांकरीता संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान (महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र व शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इत्यादी) आवश्यक असेल.
◾उपरोक्त पदांच्या दिनांक १८/०२/२०२५ रोजी मुलाखती घेणेत येतील, सदर दिवशी अधिक प्रमाणात उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहील्यास त्यापैकी काही उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २०/०२/२०२५ रोजी घेण्यात येतील.
◾मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वतःच्या खर्चाने यावे,महानगरपालिका कोणताही मोबदला देणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.