tractor anudan yojana 2025 : ‘महाडीबीटी’द्वारे दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर ३ लाख ७३ हजार शेतकऱ्यांची कृषी अवजारांसाठी निवड; ‘प्रथम अर्ज, प्रथम निवड’ तत्त्व लागू महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यंदा ३ लाख ७३ हजार ६०९ शेतकऱ्यांची विविध कृषी अवजारांसाठी निवड करण्यात आली आहे.
यामध्ये १ लाख ४२ हजार ३४१ शेतकऱ्यांची थेट ट्रॅक्टर अनुदानासाठी निवड झाली असून, २ लाख २४ हजार ६१५ शेतकऱ्यांना इतर कृषी औजारांचा लाभ मिळणार आहे. गरजू आणि वेळेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. या अनुदानामुळे शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढून उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातून विविध योजना राबविल्या जातात. लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून ७/१२, ८-अ, कोटेशन, इत्यादी कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. कागदपत्रे विहित मुदतीत सादर न केल्यास किंवा त्रुटी आढळल्यास निवड रद्द होऊ शकते. या योजनेमुळे शेतीत यांत्रिकीकरणाला गती मिळाली आहे.
निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रे सादर करावीत. अर्ज भरताना किंवा कागदपत्रे अपलोड करताना कोणतीही अडचण शेतकऱ्यांनी थेट त्यांच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
शासनाचा उद्देश प्रत्येक गरजू शेतकन्याला लाभपोहोचविणे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केला नाही, त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून ‘प्रथम अर्ज, प्रथम निवड’ या तत्त्वाने तातडीने अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
६ हजार शेतकऱ्यांना कांदाचाळ
या योजनेत निवड झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ४५६ शेतकऱ्यांना औजार बँकसाठी अनुदान मिळणार आहे. याशिवाय, ६ हजार १९७ शेतकऱ्यांना कांदाचाळ उभारणीसाठी अनुदान मिळणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
३ लाख ७३ हजार शेतकऱ्यांची निवड
यंदा महाडीबीटी पोर्टलद्वारे आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या विविध यंत्रसामग्रीच्या अनुदानासाठी एकूण ३ लाख ७३ हजार ६०९ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
कागदपत्रे सादर न केल्यास लाभ रद्द होणार
महाडीबीटी पोर्टलद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना विहित मुदतीत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. जर शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर केली नाहीत किंवा अर्ज आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास, त्यांचा लाभ रद्द होण्याची शक्यता असते.
प्रथम अर्ज, प्रथम निवड पद्धत
महाडीबीटी पोर्टलवर अनेक कृषी योजनांसाठी ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार शेतकऱ्यांची निवड केली जाते. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज केला आहे, त्यांना प्राधान्याने योजनेचा लाभ मिळतो.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
FAQ
1.अर्ज करताना कोणते तत्त्व लागू आहे?
‘प्रथम अर्ज, प्रथम निवड’ हे तत्त्व लागू आहे.
2.अर्ज करताना अडचण आल्यास काय करावे?
संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.
3.ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही, त्यांनी काय करावे?
महाडीबीटी पोर्टलवर तातडीने नोंदणी करावी.
