उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती;पगार 55000 रुपये | UMC Recruitment 2024

Created by Aditya, Date : 21.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

UMC Recruitment 2024 : महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून नमूद केलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीस हजर रहावे. उल्हासनगर महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन विभागामार्फत हि भरती राबविण्यात येणार आहे त्यासाठी थेट मुलाखत आयोजित करण्यात आल्या आहेत.

Ulhasnagar Municipal Corporation has published a new recruitment advertisement for various posts, interested and eligible candidates should read the detailed advertisement and attend the interview with all the documents on the given date at the mentioned address.

◾भरतीचा विभाग : हि भरती उलहानगर महानगरपालिकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

◾पदांचे नाव : जाहिरात वाचावी

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखत होणार असून त्याच ठिकाणी अर्ज मिळतील.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️वैद्यकीय अधिकारी

1]मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा बीएएमएस उत्तीर्ण आवश्यक.

2]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत जास्त 65 वर्षांपर्यंत

3]निवड झालेल्या उमेदवाराला 55000 तर 65000 मानधन दिले जाणार आहे.

◾नोकरीचे ठिकाण : उल्हासनगर महानगरपालिका

◾अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही.

◾मुलाखतीची तारीख : दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर रहावे.

◾मुलाखतीचा पत्ता : मा.प्रशासक तथा आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका,उलहानगर-3

◾अधिकृत संकेतस्थळ : http://www.umc.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.

◾करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितांस शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे / सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार / हक्क नसेल,नियुक्तीसाठी सक्षम असलेल्या प्राधिकरणाने विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा कर्मचाऱ्यांच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीस सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध (conflict of interest) जाहीर करणे आवश्यक राहील.

◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींस प्राप्त होणाऱ्या अधिकारा अंतर्गत येणारे आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे माहिती व आचार सामुग्री याबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा