ZP Beed Bharti 2024 : जिल्हा परिषद बीड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचा विहित नमुना जाहिरातीमध्ये दिलेला असून जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय बार्शी रोड, जिल्हा रुग्णालय बीड व स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे हे पदे भरायचे आहेत.
◼️पदांचा तपशील
- औषध निर्माता – 01 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 जागा
◼️शैक्षणिक पात्रता
- औषध निर्माता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी ची पदवी धारण केलेली असावी किंवा पदविका धारण केलेली असेल तर अर्ज करू शकता.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी बीएमएलटी मध्ये किंवा बी एम एल एस किंवा डीएमएलटी असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
◼️अनुभव : अर्जदारांना कमीत कमी एक ते तीन वर्षे अनुभवास असेल तरच ते अर्ज करू शकणार आहेत.
◼️मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला दार महिना 21 हजार रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
◼️वयोमर्यादा : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 60 वर्ष असावे
◼️अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करावी जाहिरातीमध्ये दिलेला विहित नमुना डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रासह सादर करावा.
◼️अर्ज सादर करण्याचा पत्ता : परिपूर्ण भरलेला अर्ज सिविल सर्जन ऑफिस, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ,बीड या ठिकाणी सादर करणे आवश्यक असेल.
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्जदाराने आपला अर्ज 27 सप्टेंबर 2024 पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
◼️उमेदवारासाठी सूचना
- उमेदवाराने अर्ज सादर करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी व जाहिरातीतीलच विहित नमुना डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
- वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
- वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचूनच सादर करावा.
- ही भरती प्रक्रिया जिल्हा रुग्णालय जिल्हा परिषद बीड अंतर्गत घेतले जाणार आहे.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक त्या कागदपत्रासह 27 सप्टेंबर 2024 पर्यंत पोहोचेल असा बेताने पाठवावा.
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा
👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇
👉युनियन बँकेमध्ये तब्बल 500 जागांसाठी मेगा भरती; ऑनलाईन लगेच अर्ज करा | Union Bank Bharti 2024