New Mahanagarpalika Bharti : महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी मुलाखतीद्वारे भरती होणार आहे 6 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखत घेतल्या जाणार आहे, तरी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.
◼️पदांचा तपशील
- जीव रक्षक – 01 जागा
- पंप ऑपरेटर – 02 जागा
◼️शैक्षणिक अर्हता
- जीवरक्षक – इयत्ता बारावी पास आवश्यक, पोहण्याच्या कलेमध्ये उमेदवार पारंगत असावा तसेच महाराष्ट्र स्विमिंग असोसिएशन या संस्थेकडे तांत्रिक मार्गदर्शन प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव असल्यास उमेदवाराची निवड केल्या जाऊ शकते.
- पंप ऑपरेटर : इयत्ता बारावी पास व इलेक्ट्रिशियन चा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◼️मानधन : निवड झालेल्या उमेदवाराला जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार जीवरक्षक पदासाठी 11000 रुपये तर पंप ऑपरेटर या पदासाठी 16000 रुपये दरमहा मानधन देण्यात येईल.
◼️अर्ज करण्याची पद्धत : ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार असून उमेदवारांनी 06 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 या वेळेत मुलाखतीला हजर राहावे.
◼️मुलाखतीचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे ग्राउंड समोर, कोल्हापूर.
◼️वयोमर्यादा : वर नमूद केलेल्या दोन्ही पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 45 वर्ष एवढी असावी.
◼️उमेदवारासाठी सूचना
- नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारासाठी अति मान्य असल्याबाबतचा करार स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावा लागेल.
- सदरचे नियुक्ती किंवा सहा महिन्या कालावधी करिता असेल, नियुक्त होणाऱ्या उमेदवारांचा करार समाप्त झाल्यानंतर ते वाढविण्याचे सर्वाधिकार मा. प्रशासक तथा आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांना असतील.
- अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीमध्ये दर्शवलेली पात्रता व अनुभव, अटी पूर्ण करत असल्याबाबत प्रथम खात्री करून घ्यावी व त्यानंतर अर्ज सादर करावेत.
- जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द करण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा सर्वाधिकार उपायुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.
- तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून लगेच अर्ज सादर करावा.
New Mahanagarpalika Bharti | Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
हे ही वाचा…
◾शासकीय विभागात 394 रिक्त जागांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | MSRLM Bharti 2024
◾राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स मुंबई येथे 12 वी पासवर भरती;पगार 60000 रुपये | RCFL Bharti 2024
◾जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज | ZP Pune Bharti
◾बृहन्मुंबई महापालिकेत ग्रंथपाल पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | BMC Librarian Bharti