District Court Bharti 2024 : जिल्हा व सत्र न्यायालय लातूर (Jilha Satra Nyayalay Latur Bharti) येथे पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात नोंदणीकृत पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत, हे अर्ज 25 सप्टेंबर 2024 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक असेल.
◼️पदांचा तपशील : पुस्तक बांधणीकार – 02 जागा
◼️शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणी बाबत कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असेल.
◼️वयोमर्यादा : जाहिरातीच्या दिनांक याच्या दिवशी उमेदवार 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास 43 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
◼️अर्ज करण्याची पद्धत : जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना दिलेला असून उमेदवाराने पूर्ण जाहिरात डाऊनलोड करावी व त्यातील अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या भरून ऑफलाइन पद्धतीने सादर करावा.
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी 25 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज पोहोचतील असे बेताने पाठवायचे आहेत.
◼️निवड प्रक्रिया : पुस्तक बांधणीकार या पदासाठी भरती प्रक्रियेची वेळी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास योग्य ते निकष लावून पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी लघुसूची तयार करण्यात येईल व त्यानंतर गुणवत्तेनुसार उमेदवाराची तोंडी मुलाखत घेऊन निवड केल्या जाईल.
◼️अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर
◼️उमेदवारांसाठी सूचना
- उमेदवाराने अलीकडची पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो अर्ज दिलेले जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की स्वाक्षऱ्याची सुरुवात छायाचित्रावर करून तिचा काही भाग छायाचित्र बाहेर येईल.
- उमेदवाराने दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेली चारित्र्याचे दाखले सादर करावेत तसेच त्याच्याविरुद्ध कुठल्याही न्यायालयात कोणताही फौजदारी खटला निकाली, चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करावे,असल्यास त्याचा तपशील द्यावा.
- विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला तसेच लिफाफ्यावर पुस्तक बांधणीकार पदाकरिता अर्ज असे नमूद न केलेले अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.
- पुस्तक बांधणीकार पदासाठी उमेदवारांची 20 गुणांची पुस्तक बांधणी कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल.
- उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करिता परीक्षा व मुलाखतीत बोलल्यास स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
- प्रक्रियेचे वेळापत्रक वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल.
- तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून मूळ जाहिरात डाऊनलोड करा व्यवस्थित रित्या वाचा आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात शेवटच्या तारखे अगोदर पोहोचतील अश्या बेताने अर्ज पाठवा.
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा
👇या महिन्यातील नवीन जॉब्स👇
👉बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती;लगेचच करा अर्ज | BMC Bharti 2024