तुम्ही जमिनीचे मालक आहेत कि नाही हे फक्त या कागदपत्रावरून समजेल;कोणते ते पहा | Land Record Maharashtra

Created By Aditya, Date 29.11.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Land Record Maharashtra : जमिनीचे वाद (Land Cases)  काही आपल्यासाठी नवीन नाहीत. जमिनीसाठी वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, जमिनीच्या मालकी हक्कावरूनही भरपूर वाद होतात त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते.

अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर तुमचा मालकी हक्क (Land Documents) सांगणारे काही महत्वाचे पुरावे असणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे खालीलपैकी कोणताही पुरावा असेल तर तुम्ही मालकी हक्क सांगू शकता हे सात पुरावे नेमके कोण-कोणते आहेत ते खाली पाहूया.

1.सातबारा उतारा

जमिनीचा उतारा हा जमिनीचा मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे, गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे? त्याचा किती जमिनीवरती हक्क आहे? हे नमूद केलेलं असतं. यावरून जमिनीचा खरा मालक कोण आहे त्याची ओळख पटवण्यास सुद्धा मदत होते. आता सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा देखील उपलब्ध करून दिला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.खाते उतारा किंवा आठ-अ

एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेली असते, त्यामुळे या सगळ्या गट क्रमांकामधील शेत जमिनीची जी माहिती आहे, ती माहिती एकत्रितपणे खाते उताऱ्यावरती नोंदवलेली असते. गाव नमुना आठ अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोण-कोणत्या गट क्रमांकामध्ये आहे, त्याची माहिती तुम्हाला मिळते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी गाव नमुना आठ अ हा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो.

3.जमिनी संबंधिचे पूर्वीचे खटले

एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि त्या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसची कागदपत्र, निकाल पत्रक इत्यादी कागदपत्र जपून ठेवली पाहिजेत. कारण याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी तुम्हाला करता येऊ शकतो.

4.जमीन मोजणीचे नकाशे

जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात काहीही वाद उद्भवला तर जमिनीचे मोजणी केली जाते. यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमmच्या जवळ असल्यास त्या जमिनीवरील मालकी हक्क हा प्रस्थापित करता येऊ शकतो त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे हे जपून ठेवणं गरजेचं असते. एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावरती आहे आणि त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती या नकाशावर दिलेली असते.

5.जमीन महसुलाच्या पावत्या

दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यामार्फत दिली जाणारी पावती सुद्धा जमिनीचा मालकी हक्काबाबतचा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळप्रसंगी पुरावा म्हणून तुम्हाला वापर करता येऊ शकतो.

6.प्रॉपर्टी कार्ड

बिगर शेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्का विषयी जागरूक राहणं आवश्यक असतं. बिगर शेत जमिनीवरती मालमत्तेच्या हक्क विषयी माहिती सांगणारा सरकारी कागद प्रॉपर्टी कार्ड आणि ज्या पद्धतीने सातबारा उताऱ्यावरती एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे, याची माहिती दिलेली असते.

7.खरेदीखत

जमीन खरेदी विक्रीच्या (Land Buying) व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक पुरावा असणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे खरेदीखत. खरेदीखत म्हणजे जमिनीचा प्रथम पुरावा समजला जातो आणि यावर जमिनीचा व्यवहार हा कधी झाला किंवा कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किंवा किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झालेला आहे याची सविस्तर माहिती खरेदी खतामध्ये तुम्हाला मिळते.