Gram Panchayat Online : तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना येतात, त्यासाठी किती पैसे येतात, त्या पैशाचा कसा वापर केला जातो कोणकोणत्या योजना गावांमध्ये राबवल्या जातात. त्या योजनांमध्ये तुम्ही नाव दिले ते आले कि नाही.
कोणकोणत्या योजनेतून गावामध्ये पैसा येतो, गावांमध्ये रस्ता बांधणीसाठी किती पैसा आला, मनरेगाच्या खात्यामध्ये किती पैसा आला या पैस्यामधून तुम्हाला किती रक्कम मिळणार याची सगळी माहिती तुम्ही एका क्लिकवर आता पाहू शकणार आहात.
मोदी सरकार आल्यापासून सर्व स्तरावरचे व्यवहार ऑनलाइन होऊ लागलेत आणि त्या व्यवहारामध्ये पारदर्शकता चांगल्या प्रमाणात येऊ लागली याचाच एक भाग म्हणून ग्रामविकास विभागाच्या एका पोर्टल वर जाऊन तुम्ही तुमच्या गावांमध्ये कोणकोणती कामे झालेली आहेत कोणकोणत्या योजना गावामध्ये राबवल्या जातात त्या कामासाठी किती निधी आलाय, त्याचा किती वापर केलाय याची सगळी माहिती सहज पाहू शकता.
गावातील योजनांमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याच्यासोबतच महात्मा गांधी रोजगार योजनेची सविस्तर माहिती सुद्धा पाहू शकता यामध्ये किती जणांनी नोंदणी केलेली आहे, किती जणाला यामध्ये काम मिळालं त्याच्यासोबतच त्याचे मस्टर किती जणांचं भरलं गेलं सरकारकडून त्याच्यासाठी किती पैसा आला ही माहिती सुद्धा या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता.
यादी डाउनलोड करा (Gram Panchayat Online)
या पोर्टल वरून तुम्ही सर्व खरी माहिती घेऊ शकता तुमच्या गावांमध्ये ज्या योजना आल्या आहेत त्यात तुमचे तुम्ही पाहू शकता आणि सर्व गावांची यादी डाउनलोड करू शकता आणि त्या योजनेसाठी किती पैसे आले हे सुद्धा तुम्हाला कळेल.
जर तुम्ही सादर योजनेसाठी पात्र असून सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ मिळालेला नसेल तर तुम्ही त्याची तक्रार उच्च स्तरावर करू शकता.
खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तुमचं गाव निवडून तुम्हाला पाहायचं आहे की तुमच्या गावांमध्ये कोणत्या योजनेसाठी किती निधी वितरित झालेला आहे आणि किती निधीचा वापर केला त्या वापरासाठी ग्रामपंचायतने कोणकोणत्या गोष्टी पुढे पाठवल्यात आणि कशा पद्धतीने निधी मिळवला हे पाहू शकता.