जिल्हा परिषद, डेटा एन्ट्री ऑपरेटर भरती | 12वी पास आवश्यक, पगार 25000 रुपये | Data Entry Operator Bharti 2024

Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर करीता खालीलप्रमाणे पदे भरावयाची आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

12वी पास उमेदवांसाठी चांगली सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने व्यवस्थित खालील माहिती वाचून अर्ज सादर करावा.

The following posts are to be filled for Data Entry Operator under the Education Department (Primary) Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana through Zilla Parishad. Good golden opportunity is available for 12th pass candidates and interested as well as eligible candidates should read the following information carefully and submit the application.

 

पदाचे नांव :- डाटा एन्ट्री ऑपरेटर- 02 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वेतनश्रेणी :- डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे मानधन प्रति महिना रक्कम रु. 25000/-

पात्रता :-

1] 12 वी पास किमान 50% गुण

2] टायपिंग इंग्रजी – 40 शब्द प्रति मिनिट व मराठी – 30 शब्द प्रति मिनिट

3] एम.एस.सी.आ.टी (MSCIT)

4] 01 वर्ष अनुभव आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया : शासन निर्णयाप्रमाणे “सदर पदासाठी मुलाखत घेण्यात येणार नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण भरलेला (ऑफलाईन पध्दतीने) शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. कोल्हापूर या ठिकाणी समक्ष स्विकारला जाईल.

अर्ज सादर करावयाचा कालावधी :  दि.12/12/2024 ते दि. 16/12/2024.

अर्जाचे शुल्क :- सर्व मागास प्रवर्ग-200/-, खुला प्रवर्ग- 400/-

परिक्षा शुल्क भरणा पध्दत :- १) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. 400/- व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता रु.200/- चा डिमांड ड्राफ्ट (DD) जोडणे आवश्यक / अनिवार्य आहे. व डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचा नांव व पत्ता स्वहस्ताक्षरात लिहावा. सदरचा डिमांड ड्राफ्ट (DD) शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षण विभाग, कोल्हापूर या नावांने देय असलेला असावा डी.डी. काढणेसाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राहय धरली जाणार नाही.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक प्रमाणपत्रे :- १) 10 वी व 12 वी पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका २) शाळा सोडल्याचा दाखला. ३) अनुभव प्रमाणपत्र. ४) पासपोर्ट साईज फोटो २ कॉपी ५) संगणक- एमएससीआयटी (MSCIT) प्रमाणपत्र. ६) टायपिंग मराठी- 30 wpm प्रमाणपत्र. ७) टायपिंग इंग्रजी- 40 wpm प्रमाणपत्र.

प्रवेश प्रमाणपत्र :- १) परिक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश पत्र पोष्टाने सर्वसाधारणपणे 7 दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येतील. २) परिक्षेच्या उमेदवाराने स्वतःचे प्रवेश पत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परिक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. ३) परिक्षेच्या दिनांकापूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेश पत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, प्राथमिक, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

परिक्षेस प्रवेश :- परिक्षेच्या वेळी प्रवेश पत्रासोबत ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान १ मूळ ओळखपत्र छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

परिक्षेचे टप्पे :- प्रस्तुत परिक्षा खालील तीन टप्यात घेण्यात येईल. १) मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट गुण ३० २) इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट गुण ४० ३) संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परिक्षा (परिक्षेची वेळ एक तास) गुण ३०

उमेदवारांसाठी सूचना

डाटा एन्ट्री ऑपेरटर भरती कर्मचा-यांच्या सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ नुसार 500/- रु. स्टॅम्पपेपर वर करारनामा करण्यात यावा. तसेच कर्मचा-यांच्या नियुक्ती पत्रामध्ये व त्यांचेशी करण्यात येणा-या करारनाम्यामध्ये मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा समावेश करण्यात येईल.

परिपूर्ण अर्ज सादर करणेची जबाबदारी संबंधित उमेदवारांची असून अपूर्ण अर्ज अपात्र करणेत येईल, अर्जाची छाननी, परिक्षा/निवड यादी प्रसिध्द करणे, हरकती/आक्षेप प्राप्त करुन घेणे व त्या निकाली काढणे आदी रितसर शासनाच्या तसेच शालेय पोषण आहाराकडील प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेत येईल. याबाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर www.zpkolhapur.gov.in प्रसिध्द करणेत येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

याबाबत पुनःश्च वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाणार नाही. याकरिता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास कार्यालयीन वेळेत संपर्क साधु शकता.

अटी व शर्ती :

सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेनंतर एका वर्षाच्या आत एखादया ठिकाणी कंत्राटी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झालेस प्रतिक्षाधीन यादीवरील गुणानुक्रमाचे उमेदवारास नियुक्ती आदेश दिला जाईल. प्रतिक्षाधीन यादी ही एका वर्षासाठी ग्राहय धरणेत येईल.

नियुक्तीपूर्वी उमेदवाराकडून शासनाकडील विहीत नमुन्यात रु. 100/- चे स्टॅम्पपेपरवर करारनामा करुन घेण्यात येईल आणि त्याचप्रमाणे कर्मचा-यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल.

कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासंबंधी सेवा व शर्ती, शैक्षणिक अर्हता, एकत्रित ठोक मानधन व नियुक्तीची कार्यपध्दती या संदर्भात आवश्यक ते बदल तसेच निर्णय घेण्याचे अधिकार शासनास राहतील.

डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती केलेल्या कंत्राटी पध्दतीच्या कर्मचा-यांस नियमित नियुक्तीसाटी कोणतेही हक्क असणार नाहीत, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना न्यायालयात जाता येणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा