ऑनलाईन विजेचे बिल भरणाऱ्याला मिळणार स्मार्टफोन ; महावितरणची नवी स्पर्धा | Mahavitaran Lucky Draw 2025

Mahavitaran Lucky Draw 2025 : सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांना महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे. तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, कल्याण आणि भांडूप परिमंडळातील 82 उपविभागांसाठी एकूण 1230 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रत्येक उपविभागासाठी प्रथम क्रमांकाकरिता एक स्मार्ट फोन, द्वितीयसाठी दोन स्मार्ट फोन आणि तृतीय क्रमांकासाठी दोन स्मार्ट घड्याळ, अशी प्रत्येकी पाच बक्षिसे आहेत. प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्यांची प्रतीक्षा यादी राहणार आहे.

संपर्क करूनही विजेत्यांनी 10 दिवसांत प्रतिसाद न दिल्यास, थकबाकी व इतर कारणांमुळे अपात्र ठरल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षिसे देण्यात येईल, कल्याण परिमंडळांतर्गत कल्याण एक आणि दोन, वसई, पालघर या मंडळ कार्यालयांत 40 उपविभाग, भांडूप परिमंडळांतर्गत ठाणे, वाशी, पेण या कार्यालयांतील 42 उपविभाग येतात. प्रत्येक उपविभागासाठी एप्रिल, मे व जून या महिन्यांतील ड्रॉमध्ये प्रत्येकी पाच बक्षिसे आहेत.

thumbsup

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

महावितरणच्या वेबसाइटवर निकाल

01 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत एकदाही वीज बिल ऑनलाइन भरलेले नाही, अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. लकी ड्रॉचा निकाल संबंधित महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाइटवर व नोंदणीकृत मोबाइलवरही जाहीर होईल. या योजनेबाबत महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइटवर अधिक माहिती उपलब्ध आहे.

ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ

ग्राहकांना 01 जानेवारी ते 31 मेदरम्यान सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीज बिल भरून योजनेत सहभागी होता येईल.

तसेच मागील महिन्याच्या वीज 3 बिलाची दहा रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, योजनेच्या कालावधीत ग्राहक / ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.

thumbsup

संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा