Created by Aditya, Date : 22.12.2024
PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मध्ये खालील दिलेली रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत.
या पदभरतीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने नमूद केलेल्या तारखेस थेट मुलाखतीस हजर राहावे, अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation under the control of Pune Municipal Corporation, the following vacant posts are to be filled in the National Urban Health Mission on cadre wise basis. |
◾भरतीचा विभाग : हि भरती पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : योगा प्रशिक्षक
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करायचे आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️योग प्रशिक्षक – 179 जागा
1] शिक्षण : १०वी पास व नोंदणीकृत संस्थेचे योग्य प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र.
2] वेतन : प्रती योग्य सत्र २५० रुपये या प्रमाणे मानधन दिले जाईल.
3] वयोमर्यादा : अर्जदाराचे वय १८ ते ४५ वर्षे असावे. (मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी)
◾अर्ज करण्याची पद्धत : हि निवड थेट मुलाखतीद्वारे केल्या जाणार आहे,उमेदवाराने मुलाखतीसाठी जाहिरातीतील अर्जाचा नमुना डाउनलोड करून मुलाखतीला हजर राहावे.
◾आवश्यक कागदपत्रे : अ) आधार कार्ड/ओळखपत्र ब) मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टिफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र क) १० वी ची मार्कलिस्ट ड) शासकीय व नोंदणीकृत खाजगी संस्थेचे, योग प्रशिक्षकाचे प्रमाणपत्र आवश्यक.
◾निवड प्रक्रिया : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोगांतर्गत भरण्यात येणाऱ्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
◾उमेदवारांसाठी सूचना
▪️सदरील पदे एन. यु. एच. एम. समिती अंतर्गत राहतील. त्याचा पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. ३. सदर पदे निव्वळ मानधन तत्वावर रु. २५०/- प्रत्ती योग सत्र या दराने केवळ दि. ३१/०३/२०२५ या कालावधीपर्यन्तच भरावयाचे असून पुढील वर्षात प्रकल्प अंमलबजावणी कृती आराखडयात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येईल.
▪️सन २०२४-२५ च्या कृती आराखड्यामध्ये मंजूर होणाऱ्या योगसत्रांच्या संख्येनुसार नियुक्त होणाऱ्या योगशिक्षकांना योग सत्रे विभागून देण्यात येतील. उपरोक्त नमूद करणेत आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास पहिल्या १ तासामध्ये म्हणजे सकाळी १० ते ११ या वेळेत जेवढे उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील.
▪️त्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी करणेत येणार नाही व याबाबतचा अंतिम निर्णय आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांचा राहील.
▪️मुलाखतीला जास्त उमेदवार आल्यास छाननीअंती एका पदास पाच उमेदवार या प्रमाणे पदानुसार शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील पात्र गुण व अनुभवाचे गुण यांचे आधारे गुणांचा कट ऑफ लावून त्यानुसार मुलाखती घेण्यात येतील.
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
💻अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |