State Bank Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 रिक्त जागांसाठी मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा

State Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी ! भारतीय स्टेट बँकेत (SBI Recruitment 2024) 1040 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, 23 ते 45 वर्ष असणे आवश्यक आहे तर यामध्ये एससी/ एसटी उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती

ही भरती प्रक्रिया 1040 जागांसाठी होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज 08 ऑगस्ट 2024 पूर्वी दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत, ही भरती विशेष संवर्ग अधिकारी या पदाकरिता होणार आहे, तर निवड झालेल्या उमेदवारांना यामध्ये दरमहा पगार हा 2.20 हजारापेक्षा अधिक वेगवेगळ्या पदानुसार देण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण

यामध्ये नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून जनरल ओबीसी साठी 750 रुपये तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी साठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 08 ऑगस्ट 2024 पूर्वी सादर करावेत यामध्ये निवड प्रक्रिया ही शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे घेण्यात येणार आहे, यामध्ये पात्रता आणि अनुभवाची पूर्तता करत असलेल्या Apply SBI Bank Bharti 2024 उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.

उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे तसेच दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

हे हि वाचा…

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा