महत्वाची अपडेट : तलाठी पदांची भरती;2471 पदे रिक्त! Talathi Bharti 2025

Created by Adam on 29 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Talathi Bharti 2025 : राज्याच्या महसूल विभागामध्ये सुमारे 3000 पर्यंत रिक्त जागा आहेत, यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची आहेत, सध्याच्या परिस्थितीत एक तलाठ्याकडे तीन-चार गावाचा कारभार दिलेला आहे.

प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावात तलाठी पंधरा दिवसातून कधीतरी फेरी मारतो, यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा चावडीच्या पायऱ्या चढाव्या लागतात तलाठ्याचा हा भार अनेकदा कोतवालावर देखील येत असतो.

राज्यातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांची जवळपास 2471 पदे रिक्त आहेत त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या तलाठ्यावरील भार कधी कमी होणार अस प्रश्न आता निर्माण झाला आहे. महसुल विभागात राज्यात सगळ्यात जास्त महसूल गोळा करण्यात तलाठ्याच्या गट क वर्गाचा पहिला क्रमांक लागतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

thumbsup

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक गावात चावडी व तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच याची शास्वती राहत नाही कारण एक तलाठ्यांकडे 3-4 गावाचा कारभार दिलेला असतो सातबारा,महसूल गोळा करणे,गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणुकीच्या सर्व कामेसुद्धा करावे लागतात.

तर त्यांना गाव पातळीवर मूळ काम पूर्ण करणे अवघड जात असताना इतरही कामाचा भार त्यांच्या खांद्यावर दिला जातो. सहा महिन्यापूर्वी काही तलाठी पदे भरण्यात आले मात्र रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत.तलाठ्याच्या अतिरिक्त भार कधी कमी होणार याची आणखी खात्री नाही त्यामुळे सरकारी पातळीवर तलाठी भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा निहाय तलाठ्याची रिक्त पदे

  1. अकोला – 48 जागा
  2. अमरावती – 78 जागा
  3. कोल्हापूर – 56 जागा
  4. गडचिरोली – 140 जागा
  5. गोंदिया – 717 जागा
  6. चंद्रपूर – 151 जागा
  7. जळगाव – 249 जागा
  8. जालना – 122जागा
  9. ठाणे – 81 जागा
  10. धाराशिव – 110जागा
  11. धुळे – 205 जागा
  12. नंदुरबार – 54 जागा
  13. अहिल्यानगर – 255 जागा
  14. नांदेड – 135 जागा
  15. नागपूर – 186 जागा
  16. नाशिक – 274 जागा
  17. परभणी – 15 जागा
  18. पालघर २४३ जागा
  19. पुणे 355 जागा
  20. बीड 913 जागा
  21. बुलढाणा 53 जागा
  22. भंडारा 67 जागा
  23. मुंबई उपनगर 41 जागा
  24. मुंबई शहर 17 जागा
  25. यवतमाळ 142 जागा
  26. रत्नागिरी 210 जागा
  27. रायगड 220 जागा
  28. लातूर 55 जागा
  29. वर्धा 84 जागा
  30. वाशिम 26 जागा
  31. छत्रपती संभाजीनगर 154 जागा
  32. सांगली 110 जागा
  33. सातारा 156 जागा
  34. सिंधुदुर्ग 145 जागा
  35. सोलापूर 200 जागा
  36. हिंगोली – 76 जागा

एकूण 8614 तलाठ्याची रिक्त पदे संपूर्ण जिल्हा निहाय आहेत लवकरच तलाठी पदासाठी भरती जाहीर केली जाऊ शकते त्यामुळे मागच्या तलाठी भरतीमध्ये ज्या उमेदवारांचा नंबर नाही लागला त्या उमेदवारांना आता पुन्हा अर्ज भरण्याची संधी मिळू शकते.

thumbsup

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading