व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

जिल्हा परिषद जळगाव येथे विविध पदांसाठी 45 रिक्त जागांवर भरती; पगार 25 ते 60 हजार रुपये – ZP Jalgaon Recruitment 2024

ZP Jalgaon Recruitment 2024 : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण रुग्णालयांमध्ये पदभरती प्रक्रिया खाली दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर भरल्या जाणार आहेत.

खालील पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 11 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; हि संधी सोडू नका,त्वरित अर्ज करा | Post office Bharti 2024

पदाचे नाव :

  1. वैद्यकीय अधिकारी – 42 जागा
  2. ऑडिओलॉजिस्ट – ०२ जागा
  3. फिजिओथेरपिस्ट – ०२ जागा
  4. नर्स – ०१ जागा

शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात पदवी धारण केलेली असावी अथवा पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.

शुल्क : खुल्या उमेदवारांनी रु 150/- व राखीव प्रवर्गासाठी रु. 100/- इतके चा अर्ज शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राष्ट” District Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon” या नावाने देय असलेला असावा. बँकेचा डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा कालावधी : 11 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग), जिल्हा परिषद जळगाव

पगार : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 20000 व जास्तीत जास्त 60000 रुपये मानधन दिले जाणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करण्याच्य शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष व कमल 43 वर्ष असणे आवश्यक आहे.

नाबार्ड मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | NABARD Bharti 2024

इतर सूचना :

  1. पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
  2. लहान कुटुंबाची अट दि.23/07/2020 पासून लागू करण्यात आली असून दि.23/07/2020 पासून दोनपेक्षा अधिक मुले असणारे उमेदवार 15 व्या वित्त आयोगाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
  3. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही.
  4. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवाव तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
  5. भरती प्रक्रिये दरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल तसेच सदर उपस्थिती करीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.
  6. अर्जाचा नमुना जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असुन सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  7. भरती प्रक्रियेच संपुर्ण अधिकार, पदे कमी जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्ती मध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे, इत्यादी सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असून निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी राखून ठेवलेले आहेत.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये विविध ठिकाणी 344 रिक्त जागांवर भरती;पगार 30000 रुपये दरमहा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा