Vasai Vikas Bank Bharti : वसई विकास सहकारी बँक मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
हे अर्ज उमेदवार आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या सादर करणे आवश्यक असेल, तरी इच्छुक उमेदवाराने खालील जाहिरात वाचावी आणि पात्र असाल तर लगेच अर्ज करावा.
पदांचा तपशील
1.चीफ कंपलाईन्स ऑफिसर -01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर CAIIB / JAIIB / LLM असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
अनुभव : इच्छुक उमेदवाराला कमीत कमी पंधरा वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असावा त्यातील पाच वर्षाचा अनुभव ऑडिट कंप्लेंट लीगल वरीस मॅनेजमेंट फंक्शन मधील असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा : 40 ते 50 वर्ष
2.ब्रांच मॅनेजर – 08 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर अथवा पदवी तर कोणत्याही शाखेमधून असले तरी चालेल उमेदवार किंवा पदवीधर CAIIB / JAIIB व तीन वर्षाचा अनुभव असावा.
अनुभव : उमेदवार फक्त पदवीधर असल्यास कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असावा उमेदवाराला जनरल बँकिंग ऑपरेशन्स, क्रेडिट, एनपीए मॅनेजमेंट इत्यादींचा अनुभव गरजेचा आहे.
वयोमर्यादा : 50 वर्षापेक्षा जास्त नको
3.असिस्टंट ब्रांच मॅनेजर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर अथवा पदवीधर.
अनुभव : उमेदवार असल्यास तीन वर्ष अनुभव आवश्यक फक्त पदवीधर असल्यास पाच वर्ष अनुभव आवश्यक जनरल बँकिंग ऑपरेशन क्रेडिट एनपीएम मॅनेजमेंट मधील अनुभव असल्यास उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा : 50 वर्षापेक्षा जास्त नको
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवार या पदभरतीसाठी इच्छुक असल्यास त्याने त्यांचा रेजूमे बँकेच्या ईमेल आयडी वर पाठवावा किंवा खाली दिलेल्या पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत पाठवणं आवश्यक असेल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, हेड ऑफिस, चिमाजी आप्पा मैदानाच्या पाठीमागे, वसई डेपो जवळ, वसई (वेस्ट), पालघर ४०१२०१
ईमेल आयडी : hrd@vasaivikasbank.co.in
उमेदवारासाठी सूचना
- उमेदवार ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने तसेच ईमेल आयडी सुद्धा अर्ज पाठवू शकतात.
- अनुभव असलेल्या उमेदवाराला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवाराला इंग्रजी मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे घेण्यात येईल उमेदवारांनी मुलाखत पास केल्यानंतर त्याची मेडिकल केल्या जाईल आणि त्यानंतर निवड केल्या जाईल.
- शिक्षण व अनुभवाच्या आधारावर उमेदवाराला वयामध्ये (Vasai Vikas Bank Bharti 2024) शिथिलता देण्यात येईल याची नोंद घ्यावी.