Raigad DCC Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून मात्र त्याच्यातून पूर्ण करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेले तारखेपर्यंत सादर करायचे आहेत
👉पदांचा तपशील : लिपिक / Clerk
👉पदसंख्या : एकूण – 200 रिक्त जागा
👉शैक्षणिक पात्रता : यासाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच उमेदवाराकडे MSCIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक.
👉वयोमर्यादा : यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 42 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
👉अर्ज शुल्क : यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून 590 रुपये हा आकारण्यात आलेले आहेत.
👉पगार : उमेदवाराला पगार हा 25000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
👉निवड पद्धती
- उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी व मुलाखत याद्वारे होणार आहे.
- ऑनलाइन परीक्षेतील गुणांच्या गुणांनुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या 1:3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी बँकेचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- त्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल, उमेदवाराला मुलाखतीसाठी व कागदपत्र पडताळणीसाठी मुलाखत पत्र ई-मेलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
👉नोकरीचे ठिकाण : रायगड
👉अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2024
👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.
अधिकृत संकेतस्थळ : www.rdccbank.com
मूळ जाहिरात : डाउनलोड करा