धुळे महानगरपालिकेमध्ये 10वी उत्तीर्णांसाठी विविध पदावर मोठी भरती सुरु! ;पगार 17,500 रुपये | Dhule Mahanagarpalika Bharti

Dhule Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी ! धुळे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. धुळे महानगरपालिकेमध्ये ही भरती असून विविध वेगवेगळ्या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, वेगवेगळ्या 13 पदासाठी रिक्त जागावर ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Dhule Mahanagarpalika Recruitment 2025 Details

◾भरतीचा विभाग : धुळे महानगरपालिकेत विविध विभागात जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
◾भरतीचा प्रकार : महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरीची संधी
◾पदाचा तपशील : वाहनचालक
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा भरतीमध्ये अर्जदारास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास प्रकाशक जबाबदार राहणार नाही.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता (DMC Bharti Post Details)

◾पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1.जे.सी.बी वाहनचालक – 02 जागा
2.वाहनचालक-11 जागा
◾शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दिलेल्या आहे कमीत कमी दहावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत तुम्ही सुद्धा संबंधित पदासाठी इच्छुक असाल तर जाहिरातीमधील पात्रता तपासून नंतर अर्ज सादर करावा.

इतर आवश्यक माहिती (DMC Bharti other information)

◾वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे एवढे असावे त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवाराच्या अर्ज नाकारले जातील (वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आली असून संबंधित माहिती जाहिरातीमध्ये पाहू शकता)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरतीसाठी 13 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून 21 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात.
◾एकूण पदसंख्या : 13 जागा
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 17500 आणि इतर भत्ते आणि सुट्ट्या सुद्धा लागू राहणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾आवश्यक कागदपत्र

१. विहीत नमुन्यातील अर्ज.
२. आधार कार्ड. (स्वयं साक्षांकित)
३. अर्हतेचा पुरावा. (स्वयं साक्षांकित)
४. महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र.
५. अनुभव प्रमाणपत्र.
६. जन्म तारखेचा पुरावा.
७. पासपोर्ट साईज फोटो (रंगीत, २ प्रती)
८. आ.दु.घ. प्रवर्गात अर्ज सादर करणाऱ्यांना सक्षम प्राधिकारणाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

महत्वाच्या सूचना (Dhule Mahanagarpalika Jobs important Instruction)

◾ सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा असणार नाही.सदर नेमणुका करार पध्दतीने प्रथमतः ०६ महिन्यांसाठी करण्यात येईल 06 महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत केलेल्या कामकाजाचे गुणवत्तेचा, कामाचा अनुभव व कामाची निकट याबाबत आढावा घेवून वेळोवेळी वाढविता येईल.

◾तथापी, अशी मुदत वाढविताना एकावेळी ही मुदत ०६ महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही याची काळजो नियुक्ती प्राधिकारी घेईल अशा मुदतबाढ कमाल ३ वेळा असेल. त्यानंतर उमेदवाराची पुनश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे असे सक्षम प्राधिकाऱ्याचे मत झाल्यास, त्या उमेदवारास पुनश्च निवड प्रक्रियेस नव्याने सामोरे जावे लागेल.
◾संबधित नियुक्ती प्राधिकारी महानगरपालिकेच्या वतीने नियुक्तीच्या वेळी संबधितां बरोबर विहीत प्रपत्रात करार करतील कराराचे विहीत प्रपत्र “परिशिष्ट अ” मध्ये देण्यात आले आहे कराराची सर्व कागदपत्रे जतन करुन ठेवणे ही संबंधीत कार्यालयाची जबाबदारी असेल.

◾करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणा-या अधिकारी / कर्मचा-यांना एकत्रित मानधन व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाही.शासन व महानगरपालिका वेळोवेळी सुधारीत करेल अश्या अटी व शर्ती लागू राहतील,प्राप्त होणाऱ्या अर्जाची छानणी करुन धुळे महानगरपालिका, धुळे येथील नोटीस बोर्डावर व वेबसाईटवर पात्र/अपात्र उमेदवाराची यादी वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल.
◾सदर कंत्राटी नियुक्ती नंतर कायम सेवेत सामावून घेणेबाबत मे. न्यायालयात अथवा इतर सक्षम प्राधिकारणाकडे दाद मागता येणार नाही.नियुक्ती प्राधिकारी यांना आपल्या नियुक्तीबाबत व कामकाजाबाबत शंका / तक्रार / हरकत प्राप्त झाल्यास आपली नियुक्ती संपूष्टात आणण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहील.

thumbsup

PDF जाहिरात व अर्जाची लिंक (Dhule Mahanagarpalika Vacancies Advertisement & Application)
💻ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading