जळगाव महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स व MPW पदांसाठी भरती; शिक्षण 12वी पास, पगार 18 ते 20 हजार रुपये

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 : जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्जाचा नमुना खालील लिंक वर दिलेला असून पत्ता व इतर माहिती सुद्धा खाली दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी अंतर्गत 15 वा वित्त आयोग जळगाव शहर महानगरपालिका जळगाव अंतर्गत खाली नमूद केलेली पदे भरायचे आहेत.

पदांचा तपशील

  • स्टाफ नर्स पुरुष – 03 जागा
  • स्टाफ नर्स महिला – 18 जागा
  • बहुउद्देशीय कामगार -03 जागा

शैक्षणिक पात्रता

पद क्रमांक : १ व २ साठी – जीएनएम/बीएससी नर्सिंग.

पद क्रमांक ३ साठी : विज्ञान शाखेतून बारावी तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंगचा कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कोर्स असणे आवश्यक.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष

पगार (Salary Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024)

स्टाफ नर्स पुरुष व महिलांसाठी – 20 हजार रुपये दर महिना राहील तर एम पी डब्ल्यू या पदासाठी 18000 दर महिना एवढे मासिक मानधन देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने 12 ऑगस्ट 2024 पासून 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सकाळी 11 ते 3 या कालावधीत अर्ज सादर करायचे आहेत, हे अर्ज स्वतः पोस्टाने कुरिअरने किंवा स्पीड पोस्ट ने पाठवू शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, अनुभवाचे कागदपत्र इत्यादी सह वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, जळगाव 425001 या ठिकाणी सादर करायचे आहेत.

पोस्टाने किंवा कुरियरने उशीर झाल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवाराची निवड

प्राप्त झालेल्या अर्ज नुसार गुणानुक्रमे उमेदवाराची निवड केल्या जाईल त्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेऊन अंतिम निवड यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

अर्जाचे शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराने 500 रुपये तसेच मागासवर्ग प्रवर्गासाठी उमेदवारांनी 350 रुपये रकमेचा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्षक “Corporation Integrated Health and Family Welfare Society, Jalgaon” या नावाने अर्ज सोबत सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

विहित नमुन्यातील अर्ज बाय हॅन्ड, पोस्टाने, स्पीड पोस्ट, कुरिअरने स्वीकारले जाणार आहेत अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवारासाठी सूचना

  • अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदर जाहिरात खाली लिंक वर उपलब्ध आहे त्या जाहिरातीतील विहित नमुन्यातच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या उमेदवाराला कंत्राटी कालावधी त्याच सोयीनुसार ठिकाण बदलून मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
  • विहित नमुन्यातील अर्ज वर नमूद केलेल्या पत्त्यावरच पाठवण्यात यावेत.
  • पदे कमी जास्त करण्याचा अधिकार व नियुक्ती आदेश देण्याचा अधिकार आयुक्त तथा अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती समिती जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांच्याकडे राखीव राहतील.
  • अर्जासोबत उमेदवाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्राच्या साक्षांकित प्रति पाठवाव्यात साक्षांकित प्रति नसलेले व अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

हे ही वाचा…

BNCMC Recruitment 2024 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती;पगार 32000 रुपये