LIC HFL Bharti 2024 : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागावर विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
25 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झाली असून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत.
पदांचा तपशील
ज्युनिअर असिस्टंट (कनिष्ठ सहाय्यक) – 200 जागा (महाराष्ट्रात 53 जागा)
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कमीत कमी 60% गुणासह पदवी धारण केलेले असावी तसेच संगणक चालवण्याचे ज्ञान उमेदवाराला असणे आवश्यक आहे, अनुभव असणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा (Age Limit LIC Bharti 2024)
01 जुलै 2024 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 28 वर्षे असावे 21 वर्षापेक्षा कमी किंवा 28 वर्ष 28 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अश्या उमेदवाराला अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
निवड प्रक्रिया
कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेऊन त्यानंतर पात्र असणाऱ्या उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल आणि मुलाखती द्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल, ऑनलाईन परीक्षेच्या माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
अर्ज कसा करावा
उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्जाच्या लिंक वरून 25 जुलै 2024 पासून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, अर्ज सादर करते वेळेस कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सोबत जोडायचे आहेत.
अर्जाचे शुल्क (Fees for LIC HFL Bharti 2024)
सर्व उमेदवारासाठी 800 रुपये एवढे शुल्क आकारले असून यामध्ये जीएसटी चा समावेश नसेल हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करते वेळेस उमेदवाराला भरायचे आहे.
उमेदवारासाठी सूचना
- उमेदवाराने परीक्षेला हजर राहतानी कॉल लेटर ची प्रिंट सोबत ठेवणे आवश्यक असेल त्यासोबत ओळखपत्राची प्रत सुद्धा सोबत ठेवावी.
- अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने मूळ जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचावी आणि त्यानंतरच पात्र असेल तर अर्ज सादर करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराने हे A4 कागदावर अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी,मुलाखतीच्या वेळेस अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे विचारले जाऊ शकतात त्यावेळेस उमेदवाराने हे अर्ज ची प्रत दाखवणे आवश्यक असेल.
- एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड वर नमूद केलेल्या पदामध्ये (Apply LIC Bharti 2024) बदल करू शकते तसेच पदभरती रद्द सुद्धा करू शकते याचे पूर्ण अधिकार एलआयसी ने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत.