Samaj Kalyan Vibhag Bharti : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Social Welfare Department of Government of Maharashtra has published a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the necessary documents. |
◾भरतीचा विभाग : हि समाज कल्याण आयुक्तालय पुणे मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, अधीक्षक/वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05 जागा
- समाज कल्याण निरीक्षक – 39 जागा
- अधीक्षक/वॉर्डन – 153 जागा
- उच्च श्रेणी लघुलेखक – 10 जागा
- निम्न श्रेणी लघुलेखक – 03 जागा
- लघुलेखक – 09 जागा
पदानुसार वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आलेली आहे, इच्छुक उमेदवाराने अर्ज करण्यागोदर जाहिरातीमध्ये पात्रता तपासून पाहावी.
◾नोकरीचे ठिकाण : समाज कल्याण आयुक्तालय, पुणे, महाराष्ट्र राज्य
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 15 डिसेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग – 1000 रुपये व मागास प्रवर्ग – 900 रुपये
◾अधिकृत संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.